मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागताला अवघ्या काही तासांचा कालावधी उरला आहे. न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर नवीन वर्षाचं स्वागतही सुरु झालं आहे. आपल्याकडे आतषबाजी करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पण जगभरात असे अनेक देश आहेत त्या ठिकाणी अगदी अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. 


दरवाज्यावर प्लेट फोडण्याची परंपरा
जर आपल्याला दरवाज्यावर अनेक प्लेट्स फुटलेल्या दिसल्या तर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. परंतु डेन्मार्कमध्ये ही गोष्ट घडते. डेन्मार्कमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना घराच्या दरवाज्यावर प्लेट्स फोडल्या जातात. असं केल्यानं नवीन वर्ष हे सुख आणि समाधान घेऊन येईल अशी समजूत यामागे आहे. या प्लेट्स स्वत:च्या किंवा नातेवाईकांच्या घरच्या दारावर जाऊन फोडल्या जातात. 


रात्री 12 वाजता द्राक्ष खाणे
स्पेनमध्ये नवीन वर्षाचं स्वागत हे रात्री 12 वाजता द्राक्ष खाऊन करण्यात येतं. नवीन वर्षाच्या मध्यरात्री 12 वाजता, सर्वजण द्राक्षांवर तुटून पडतात. रात्री 12 वाजता द्राक्ष खाल्ल्याने पुढचे 12 महिने हे चांगले जातात असा समज स्पेनमध्ये आहे. 


जपानमध्ये घंटी वाजवून स्वागत
आशियायी देश जपान आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात जपान आणि दक्षिण कोरियाचा वरचा नंबर लागतो. जपान आणि दक्षिण कोरियात सगळीकडे घंटी वाजवण्याची प्रथा आहे. जपानमध्ये 108 वेळा घंटी वाजवली तर ती शुभ मानली जाते. 


वस्तू फेकून द्यायच्या
अमेरिकेच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत सर्वाधिक जल्लोषात केलं जातं. या ठिकाणी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उंचावरून अनेक वस्तू फेकल्या जातात. इंडियाना भागामध्ये उंचावरुन टरबूज फेकून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. 


महत्त्वाच्या बातम्या :