Happy New Year 2022 LIVE : नववर्षाचं जल्लोषात स्वागत; निर्बंध असतानाही मंदिरांमध्ये गर्दी
Happy New Year 2022 LIVE : नवीन वर्षातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नवीन वर्षाची सुरुवात तुळजाभवानी च्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी तुळजापुरात तोबा गर्दी केली आहे महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचे दर्शनाचा लाभ घेतला.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षांची सुरुवात संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यासाठी शेगावातील मंदिरात आज सकाळी पहिल्या आरतीला भाविकांनी हजेरी लावली. आज नवीन वर्षाची सुरुवात हजारो भाविक संत गजाननाच्या दर्शनाने करत असून देशभरातून हजारो भक्त शेगावात दाखल झाले आहेत.
नववर्षाच्या सुरुवातिला राज्यातील अनेक मंदिरं सजली आहेत आपल्या वर्षाची सुरुवात देव दर्शनाने व्हावे ही सर्वांचीच इच्छा असते. पुण्यात देखील श्रीमंत दडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.
दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीमंत दडूशेठ हलवाई गणपती मंदिर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अतिशय सुंदर रित्या सजवल जात आणि आपल्या लाडक्या बाप्पाच दर्शन घेवून सारेजण आपल्या वर्षाची सुरूवात करतात तसेच येणार नवीन वर्ष सुखाचं जावो ही मनोकामना मागतात.
पहाटे 6 वाजता दर्शन सुरू होताच भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली. कडाक्याच्या थंडीतही भाविक साई दर्शनासाठी आतूर होते. नववर्षानिमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत नववर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात साजरं करण्यात येत आहे. सिडनीतील हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून फटाक्याच्या आतषबाजीने आसंमत उजळला आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : आज 31 डिसेंबर. म्हणजेच 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.
सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहेत निर्बंध?
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.
गूगल डूडलच्या खास गोष्टी
गूगलनं आज न्यू इयर सेलिब्रेशन या थीमचं डूडल शेअर केलं आहे. या डूडलमध्ये मेणबत्ती, स्पार्कल, कॅन्डी आणि लाइट्स आहेत. न्यू इयर इव्हसाठी हे डूडल तयार करण्यात आहे. गूगलचे हे डूडल रात्री 12 वाजता लाइव्ह झाले. गूगल डूडलमधील google लेटरमधील O या लेटमध्ये एका कॅन्डीचे डिझाइन आहे. तर G या लेटरला पार्टी हॅट घालण्यात आली आहे. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता ही कॅन्डी पॉप होणार आहे. या डूडलवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रिनवर स्पार्कल्स दिसतील.
डूडलसोबत दिला खास मेसेज
' इट्स अ रॅप फॉर 2021, हॅप्पी न्यू इयर इव्ह!' असा मेसेज गूगल डूडलनं त्याच्या डूडलमधून दिला आहे. असं म्हणलं जातयं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गूगल डूडलचं डिझाइन हे साधे ठेवण्यात आले आहे.वेगवेगळ्या थीमवर आधारित असलेले गूगल डूडल्स नेहमीच यूझर्सचे लक्ष वेधत असतात. काही दिवसांपूर्वी गूगलने खास डूडल तयार केले होते. या डूडलमध्ये गूगलने पॉप्यूलर 'पिझ्झा मेन्यू' ची माहिती दिली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -