Omicron variant : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा अतिशय वेगाने संसर्ग होत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीलाही ओमायक्रॉन जुमानत नाही. कोरोनातानू बरे झालेल्या आणि फायझर लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या अँटीबॉडीजला ओमायक्रॉन व्हेरियंट चकवा देतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.


संशोधकांनी the journal Cell मध्ये प्रसारित केलेल्या संशोधनातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीविरोधात लढणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक अनेक अँटीबॉडीज ओमिक्रॉन विरूद्ध कुचकामी ठरतील, असा दावा संशोधकांनी the journal Cell केला आहे. या सर्व चिंताजनक रिपोर्ट्समध्ये एक दिलासादायक संशोधनही समोर आलं आहे. फायझर लसीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) आणि AstraZeneca आणि फायझर लसीचा मिस्क डोस ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात प्रभावी ठरेल. 


इतर कोरोना व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक वेगाने संसर्ग होतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगभरात प्रसार होण्याची भीती असल्याचे संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधकांनी अभ्यासात गैर धोकादायक विषाणूसारखे कण वापरले, जे ओमिक्रॉन स्पाइक प्रथिने वाहून नेतात. विषाणूच्या प्रवेशाचे विश्लेषण आणि त्याच्या प्रतिबंधासाठी योग्य आहेत. स्पाइक प्रोटीनचा वापर SARS-CoV-2 व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संक्रमित करण्यासाठी करतात. 


कॅसिरिविमाब आणि इमडेविमाब (Casirivimab and Imdevimab) तसेच इटेसेविमाब आणि बामलानिविमाब या अँटीबॉडीजचे (Etesevimab and Bamlanivimab) मिश्रण सध्या कोरोनाविरोधातील (COVID-19) लढ्यासाठी वापरले जात आहे. पण या अँटीबॉडीज ओमायक्रॉ व्हेरियंटविरोधात कुचकामी ठरत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.  फक्त सोट्रोविमाब (Sotrovimab) अँटीबॉडीज ओमायक्रॉनच्या विरोधात प्रभावी ठरत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. 


'आम्ही केलेल्या अभ्यासात असे दिसून आलेय की, कोरोना विरोधात सध्या असलेल्या बहुतेक अँटीबॉडीज ओमायक्रॉन विरोधात कुचकामी ठरतील, असे जर्मनचे मार्कस हॉफमन यांनी सांगितलं. ते the journal Cell प्रसारित झालेल्या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आहेत. सोट्रोविमाब (Sotrovimab) अँटीबॉडीज अपवाद वगळता इतर अँटीबॉडीज ओमायक्रॉनविरोधात अप्रभावी ठरतील, असेही हॉफमन यांनी सांगितलं. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live