U19 Asia Cup 2021 Final: दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर अंडर-19 आशिया चषकाचा अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेला पराभूत करून विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पावसामुळं हा सामना 50 ऐवजी 38 षटकाचा करण्यात आला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. श्रीलंकेच्या संघाला 38 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, डेकवर्थ लुड्सच्या नियमानुसार भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळालं. हे लक्ष्य भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 22 व्या षटकातच पूर्ण केलं. 


या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं एक विकेट्स गमावून 22 व्या षटकात सामना जिंकलाय. भारताचा सलामीवीर हरनूर सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद 56 धावांची खेळी केली. यात सात चौकारांचा समावेश आहे. तर, शेख रशीदनं 31 धावांची संयमी खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. महत्वाचं म्हणजे, भारतानं आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकावर नाव कोरलंय. तसेच अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारला नाही. भारताच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जातंय.


बीसीसीआयचं ट्वीट- 



संघ-


भारतीय संघ- हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, यश धुल्ल (क), निशांत सिंधू, राज बावा, आराध्या यादव (वि.), कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार


श्रीलंकेचा संघ- चामिंडू विक्रमसिंघे, शेवोन डॅनियल, ड्युनिथ वेललागे (कर्णधार), रानुदा सोमरथने, रवीन डी सिल्वा, ट्रेवीन मॅथ्यू, अंजला बंडारा (विकेटकिपर), यासिरु रॉड्रिगो, पवन पाथिराजा, सदिशा राजपक्षे, मथीशा पाथिराना


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha