Formula One | फॉर्म्युला वन शर्यतीत दोन कारच्या अपघाताचा थरार! हॅमिल्टन आणि वेर्स्टापेनच्या कारची टक्कर
Formula One | फॉर्म्युला वन शर्यतीत दोन कारच्या अपघाताचा थराराचा व्हिडीओ समोर आला आहे. हॅमिल्टन आणि वेर्स्टापेनच्या कारची टक्कर झाली आहे.
Formula One : वेगाच्या थरारासाठी प्रसिद्ध असलेल्या फॉर्म्युला वन रेसमध्ये आज (रविवारी 12 सप्टेंबर) काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. इटालियन ग्रँड प्रीक्सच्या फॉर्म्युला वन रेसमध्ये जेतेपदाचे प्रतिस्पर्धी लुईस हॅमिल्टन आणि मॅक्स वेर्स्टापेन यांच्या कार्सचा मोठा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
मर्सिडीज स्पर्धेचा सात वेळा विश्वविजेता असलेला हॅमिल्टनची रेड बुलचा चॅम्पियनशिप असलेल्या मॅक्स वेर्स्टापेनसोबत शर्यत सुरु होती. यावेळी या दोघांच्या कार्सचा अपघात झाला. एकाची कार दुसऱ्याच्या कारवर चढली. दोन्ही चालक बाहेर पडले असून सुरक्षा कार तैनात करण्यात आली आहे. दोघांनाही मोठी दुखापत झाली नाही.
Max Verstappen [@Max33Verstappen | @redbullracing] y Lewis Hamilton [@LewisHamilton | @redbullracing] fuera del #ItalianGP #F1 pic.twitter.com/Vd4z55435r
— Samuel Prieto (@Samuel_Prieto) September 12, 2021