एक्स्प्लोर

अवघ्या 16 वर्षांच्या ग्रेटा थनबर्गचा 'टाइम पर्सन ऑफ द इयर' 2019 ने गौरव

अवघ्या 16 वर्षांची स्वीडिश एक्टिविस्ट ग्रेटा थनबर्गला बुधवारी टाइम मॅगझिनतर्फे 2019चं 'पर्सन ऑफ दी इयर' म्हणून गौरवण्यात आलं.

मुंबई : हवामान बदलावर आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण जगभरात चळवळ उभारणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग अवघ्या 16 वर्षांची आहे. स्वीडिश अ‍ॅक्टिविस्ट ग्रेटा थनबर्गला बुधवारी टाइम मॅगझिनने 2019चं 'पर्सन ऑफ दी इयर' म्हणून सन्मानित केलं आहे. एवढचं नाहीतर ग्रेटा थनबर्ग या वर्षाच्या शेवटच्या टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. हा बहुमान मिळवणारी ग्रेटा संपूर्ण जगातील सर्वात तरूण व्यक्ती ठरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. संपूर्ण जगभरातून ग्रेटाच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत होतं. मग ते रस्त्यावर उतरून करण्यात आलेली आंदोलनं असो किंवा संयुक्त राष्ट्राची बैठकीत काही देशांविरोधात करण्यात आलेलं तिचं भाषण, ग्रेटाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी आवाज उठवला आहे. जेव्हा व्हायरल झालं होतं ग्रेटाचं भाषण सप्टेंबरमध्ये ग्रेटा थनबर्गने UN मध्ये केलेल्या भाषणाची संपूर्ण जगभरात चर्चा होती. या भाषणात तिने जगभरातील नेत्यांना थेट प्रश्न विचारला होता, 'How Dare You?'. ग्रेटा म्हणाली होती की, जगभरातील अनेक मोठे देश कार्बन उत्सर्जनाकडे दुर्लक्ष करत असून ते रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाहीत, त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्येचा संपूर्ण जगाला सामना करावा लागत आहे. ग्रेटा थनबर्ग 2015 मध्ये चर्चेत आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये अवघ्या 15 वर्षांच्या ग्रेटाने स्वीडिश संसदेबाहेर आंदोलन करण्यासाठी शाळेला सुट्टी घेतली होती. तिच्या हातात एक बोर्ड होता, त्यावर लिहिलं होतं की, 'stronger climate action'. जसं इतर मुलांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर तेदेखील ग्रेटाच्या चळवळीत सहभागी झाले. कोण आहे ग्रेटा थनबर्ग? अवघ्या 16 वर्षांच्या ग्रेटाला नोबेल पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं. तसेच अवघ्या काही महिन्यांत जगातील पर्यावरण चळवळीची आंतराष्ट्रीय राजदूतही झाली. डिसेंबर 2018मध्ये पोलंडमधील कॅटोविस शहरात जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मानही या शाळकरी मुलीला मिळाला होता. एवढचं नाहीतर 200 राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांना ग्रेटाने जाहिरपणे फैलावर घेतले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget