Golden Coffee Viral Video : चहा आणि वाईननंतर कॉफी हे जगातील सर्वाधिक पसंतीचे पेय आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कॉफीची वेगळी क्रेझ आहे. काहींना सकाळची सुरुवात कॉफीने करायची असते. अशा परिस्थितीत कॉफीबाबतही अनेक प्रयोगही केले जातात. सध्या सोशल मीडियावर गोल्डन कॉफीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लोक 24 कॅरेटच्या गोल्ड कॉफीचा व्हिडिओ पाहून पिण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
'गोल्ड कॉफी' दुबईच्या खास पेयांपैकी एक
दुबई हे नेहमीच सोन्यासाठी आणि तेथील राहणीमानासाठी ओळखले जाते. ही सोन्याची कॉफी देखील दुबईचेच उत्पादन आहे. ही कॉफी दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या 24 कॅरेट कॅपेचिनोची खास गोष्ट म्हणजे त्यावर सोन्याचे मुलामा लावला जाते. त्यामुळे ही कॉफी सोन्याच्या कॉफीसारखी दिसते. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चमचा वापरून कॉफीमध्ये सोन्याचे मुलामा मिसळत असल्याचे दिसून येते. या कॉफीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ती 26 यूएम डॉलर्समध्ये उपलब्ध आहे.
व्हिडिओ पाहा :
गोल्डन कॉफीचा हा व्हिडिओ ilonacafe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर ही कॉफी ट्राय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले - 'मी यासाठी दुबईला जात आहे'. त्याच वेळी, इतर वापरकर्त्यांनी कॉफीची प्रशंसा करताना टिप्पण्या लिहिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अॅप
- Tiger 3 Release Postponed : टायगर 3 चित्रपटावर कोरोनाचं सावट, शूटींग रद्द
- Sara Ali Khan : सारा अली खान करतेय 'या' व्यक्तीला डेट? ज्याची आहे कोट्यवधीची संपत्ती
- आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha