Tiger 3 Release Postponed : बॉलिवूडचा 'भाईजान' अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आगामी बहुचर्चित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) ला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनचा धोका पाहचा या चित्रपटाच्या चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. बहुप्रतिक्षित टायगर 3 चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आलेली ऑल टाईम ब्लॉकबस्टर जोडी सलमान खान आणि कतरिना जानेवारीच्या मध्यात एका महत्त्वपूर्ण शूटिंग शेड्यूलसाठी नवी दिल्लीला जात होती. या शेड्युलमध्ये कलाकारांनी मुख्य शूटिंग पूर्ण होणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता 'यशराज फिल्म्स'ने (Yashraj Films) हे शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे.
मनीश शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावरील आकर्षण वाढवत लोकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि कतरिना कैफ या महिन्यात दिल्लीत एक अतिशय महत्त्वाचा सीन चित्रित करण्याच्या तयारीत होते. यासाठीची सर्व तयारी देखील झाली होती. पण, दिल्लीतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि लवकरच दिल्लीत तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने, दिग्दर्शक मनीष शर्मा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्यासह निर्मात्यांना सध्या शूटिंग पुढे ढकलणे भाग पडले.
'टायगर 3' हा एक था टायगर आणि टायगर जिंदा है यां चित्रपटांच्या सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर प्रेक्षक आता 'टायगर 3' सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचे महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण दिल्लीमध्ये होणार होते. टायगर 3 चित्रपटाचे 12 जानेवारीपासून चित्रीकरण सुरु होणार होते. 15 दिवसांच्या चित्रीकरणाचे वेळआपत्रक तयार करण्यात आले होते. दरम्यान, दिल्लीसह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूंच्या संसर्गाची वाढ पाहता, आता हे चित्रीकरणाचे शेड्युल पुढे ढकलण्यात आलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता चित्रीकरणाचे पुढील वेळापत्रक नियोजित केले जाईल आणि नंतरच्या टप्प्यावर कार्यान्वित केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट, लग्नाच्या 9 वर्षानंतर विभक्त
- Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अॅप
- Bulli Bai App Case : 'बुली बाई' अॅप प्रकरणात चौथी अटक, उत्तराखंडमधील 21 वर्षीय तरुण अटकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA