मुंबई : जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा परिणाम आशियाई बाजारात पाहायला मिळाला. SGX NIFTY वर आज 0.7 टक्क्यांनी दबाव दिसून आला. अमेरिकेत डाऊ मार्केटवर आज 300 अंकाचा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील मार्केटवर विक्रमी साप्ताहिक वाढ पाहायला मिळाली. फेड बँकेने घेतलेल्या आर्थिक निर्णयाने आणि कोरोनाचा होणारा प्रसार कमी झाल्याने मार्केटमध्ये चांगले बदल पाहायला मिळाले.


मागच्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकेतील मार्केट बंद होतं. गेल्या संपर्ण आठवड्यात डाऊ मार्केट जवळपास 12 टक्के वधारेला पाहायला मिळाला. 2009 नंतर नॅस्डॅकमध्ये 10.6 टक्के वाढल्याने गेला आठवडा चांगला राहिला. अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकड्यात वाढ झाल्याने 60 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. दरम्यान फेडने कठोर आर्थिक पावलं उचलत 2.3 लाख करोडचं पॅकेजची घोषणा केली आहे.

दरम्यान तेल निर्यात करणाऱ्या सर्व देशांनी तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक मे पासून दररोज 97 लाख बॅरलचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेक्सिकोने एक लाख बॅरल उत्पादन कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. सोन्याच्या किंमतीही वधारलेल्या दिसून आल्या. गेल्या सात वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. फेडकडून मिळालेल्या आर्थिक साहायत्तामुळे सोन्याच्या किंमती वाढलेल्या दिसून येत आहे.

कोरोनामुळे जगभरात एक लाख 14 हजार जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18500 लाख पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1,853,155 वर पोहोचली आहे. तर 114,247 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तर मृतांच्या आकड्यांमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, इटलीमधील मृतांच्या आकड्यात गेल्या तीन आठवड्यांपासून घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या : 

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटांवर छापा : सुब्रमण्यम स्वामी


देशाची अर्थव्यवस्था डबघाईला असताना शेअर बाजारात तेजी कशी? : अरविंद सुब्रमण्यन

भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार, नजिकच्या काळात आणखी खोलात जाण्याची शक्यता : रघुराम राजन