G-20 शिखर परिषदेवर कोरोनाचे संकट? अनेक देशांच्या नेत्यांच्या भेटीनंतर कंबोडियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण
Cambodian PM Corona Positive : कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी अलीकडेच अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली
Cambodian PM Corona Positive : कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन (Hun Sen) यांना कोरोना विषाणूची (Corona) लागण झाल्याचे आढळले आहे. G-20 शिखर परिषदेत (G-20 Summit) सहभागी होण्यासाठी सेन इंडोनेशियातील बाली येथे पोहोचले होते. तत्पूर्वी, त्यांनी कंबोडियातील नोम पेन्ह येथे झालेल्या आग्नेय-आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले की, सोमवारी रात्री त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. ते म्हणाले, इंडोनेशियातील एका डॉक्टरने याबाबत पुष्टी केली आहे की, त्यांना कोविड -19 ची लागण झाली आहे.
हुन सेन कंबोडियाला परतणार
हुन सेन यांनी सांगितले की, ते G-20 शिखर परिषद सोडून कंबोडियाला परतत आहेत. G-20 परिषदेनंतर बँकॉक येथे होणाऱ्या आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) गटाच्या बैठकीत ते उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेचे ते यजमान होते. परिषदेत सेन यांनी अनेक नेत्यांची समोरासमोर भेट घेतली. बायडेन व्यतिरिक्त त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि इतर अनेक नेत्यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही बालीतच, कंबोडियाच्या PM ना कोरोनाची लागण ही चिंतेची बाब
G -20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बाली येथे पोहोचले आहेत . त्याच वेळी, सेन ज्या जागतिक नेत्यांना भेटले होते त्यापैकी बायडेन, ट्रूडो आणि लॅव्हरोव्ह हे देखील शिखर परिषदेत उपस्थित आहेत. दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेत जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे नेते सहभागी होत आहेत आणि अशा परिस्थितीत सेन यांना कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे. G-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत इतर नेत्यांसाठीही कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोमवारी इंडोनेशियातील बाली येथे पोहोचले.
इतर महत्वाच्या बातम्या