एक्स्प्लोर
जी20 शिखर परिषद : मोदी-ट्रम्प भेट, अमेरिकन उत्पादनांवरील वाढीव आयात शुल्कासह अनेक मुद्द्यांवर चर्चा
जी 20 शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सकाळी साडेसहा वाजता (भारतीय वेळेनुसार) द्विपक्षीय चर्चा झाली.
ओसाका : जी 20 शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सकाळी साडेसहा वाजता (भारतीय वेळेनुसार) द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण आणि 5 जी नेटवर्क या मुद्द्यांवर चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल दाखवलेल्या जिव्हाळ्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. त्याआधी जपान, अमेरिका आणि भारत या तीन देशांमध्ये त्रिपक्षीय चर्चा झाली. जपान अमेरिका आणि भारत या तीन देशांच्या इंग्रजी नावाच्या अद्याक्षराचा वापर करत या बैठकीला 'जय' हे नाव देण्यात आले होते.
दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकन उत्पानदनांवरील भारताने वाढवलेल्या जकात कराचा (वाढीव आयात शुल्काचा) मुद्दा उचलला. भारताने आमच्या उत्पादनांवरील जकात कर मागे घ्यावे. अशी इच्छा व्यक्त केली.
मोदींसोबतच्या भेटीपूर्वीदेखील ट्रम्प यांनी या मुद्द्यावरुन एक ट्वीट केले होते. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, "मी मोदींसोबत भेटीसाठी उत्सुक आहे. पण त्यांनी अमेरिकी उत्पादनांवर जे कर लावले आहेत ते मान्य करण्यासारखे नाहीत. गेल्या काही दिवसात ते आणखी वाढलेत. ते तातडीनं कमी व्हावेत"
त्यानंतर मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यासोबत माझी अनेक विषयांवर चर्चा झाली. भारत अमेरिकेसोबत ईराण, 5 जी, द्विपक्षीय संबध आणि संरक्षण विषयांवर चर्चा करु इच्छितो. त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करु. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement