एक्स्प्लोर

Nobel Prize 2022: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize for Literature: फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Nobel Prize for Literature : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला आहे. अॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अ‍ॅनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांचा जन्म 1940 मध्ये झाला. फ्रान्समधील नॉर्मंडीमधील लहान शहरातील यवेटोटमध्ये त्यांचे बालपण केले. या लहान शहरात त्यांच्या आई-वडिलांचे  एक किराण्याचे दुकान आणि कॅफे होते. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने  त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अॅनी एर्नो यांनी 1974 मधील Les Armoires vides (Cleaned Out) या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांना  La Place (A Man's Place) या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कार मिळाला. 

मागील वर्षीचा नोबेल साहित्य पुरस्कार टांझानियामध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले लेखक अब्दुलराझक गुरनाह यांना देण्यात आला होता. त्यांच्या कादंबरीतून व्यक्ती आणि समाजांवर स्थलांतराच्या परिणामावर भाष्य करतात. 

कोण आहेत अॅनी एर्नो?

अॅनी एर्नो या लहानपणापासून महत्त्वाकांक्षी राहिल्या आहेत. आपल्या लेखनात अॅनी यांनी सातत्याने विविध मार्गाने, पद्धतीने लिंग, भाषा आणि वर्गांवर आधारीत असमानतेवर लिखाण केले. 

अॅनी एर्नो यांचे साहित्य हे एक प्रकारे राजकीय भाष्य करणारे असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या साहित्यातून असमानता भेदभावाविरोधात भाष्य करण्यात आले. 

दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार स्थगित

1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात फक्त दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे पहिल्यांदा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला होता. तर, दुसऱ्यांदा 2018 मध्ये स्वीडिश अॅकेडमीच्या परीक्षक सदस्या कॅटरिना यांचे पती आणि फ्रेंच फोटोग्राफर जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे पुरस्कार स्थगित करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरुप काय?

सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिशी क्रोनर ( जवळपास 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वीडिशी क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget