California Church Firing : अमेरिकेत (America) अलिकडेच अनेक गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. नुकताच कॅलिफेर्नियामधील (California) एका चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात एका नागरिकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आलं आहे.


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने सांगितले की लगुना वुड्स शहरातील जिनिव्हा प्रेस्बिटेरियन चर्चमधून गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू आला. ही घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. गोळीबाराचा आवाजामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


चर्चमध्ये 30 जण उपस्थित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून हत्यार बंदुक जप्त करण्यात आली आहे. ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाच्या प्रवक्त्याने माहिती देत सांगितले की, गोळीबार झाला तेव्हा चर्चमध्ये 30 जण उपस्थित होते. चर्चमधील उपस्थितांपैकी बहुतेक लोक मूळचे तैवानचे होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने द्वेषातून ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.


शनिवारी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू 


अमेरिकेत याआधीही अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. शनिवारीही न्यूयॉर्कमध्ये बफेलो एका व्यक्तीने एका सुपरमार्केटमध्ये अंदाधूंद गोळीबार केला. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला, तसेच तीन लोक जखमी झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या