Door of Aliens House : अवकाशाच्या अनेक रहस्यं दडलेली आहेत. नासा (NASA) आणि अन्य अवकाश संशोधन करणाऱ्या संस्था आणि शास्त्रज्ञ दररोज काही ना काही नवीन शोध घेण्यासाठी संशोधन करत असतात. संशोधनामधून आतापर्यंत अनेक छुप्या रहस्यांची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संशोधन करणारी संस्था नासाला मंगळावर काहीतरी विचित्र आढळलं आहे. अलीकडेच नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावरील (MARS) दगडामध्ये चौकोनी मार्ग दिसला. हे पाहून तिथून कुठेतरी मार्ग असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र, दगडात बनवलेल्या या दरवाजाच्या आत काय आहे, हे सध्यातरी कळू शकलेलं नाही.


हे फोटो पाहिल्यानंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले की मंगळाच्या मध्यभागी जाण्यासाठीचा मार्ग सापडला आहे. किंवा हा मार्ग एलियनच्या (Alien) घराचा दरवाजा देखील असू शकतो. तसेच, काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज व्यक्त केला आहे की, मंगळावरील भूकंपामुळे दगड तुटल्याने हा एक आकार तयार झाला आहे किंवा हा आकार दगडांवर मंगळ ग्रहावर असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या दबावाचा परिणाम आहे. मे महिन्याचा सुरुवातीलाच 4 मे 2022 रोजी मंगळ ग्रहावर सर्वात भयानक भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती.






 


नासाने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर काही शास्त्रज्ञांनी असल्याचं म्हटलं आहे की, हा दगडाच्या मध्यभागी तयार केलेला खड्डा आहे. हा खड्डा लाल मातीने भरलेला आहे. मंगळावरील भूकंपामुळे दगडाचे तुकडे झाले आणि त्यामुळे दरवाजा दिसू लागला. हा दरवाजा जिथे सापडला त्याला शास्त्रज्ञांनी ग्रीनह्यू पेडिमेंट म्हटलं आहे.


या फोटोंचे वर्णन करताना नासाने सांगितले की, गेल्या काही वर्षांत मंगळावरील लँडर्स आणि रोव्हर्सनी अतिशय विचित्र आणि नेत्रदीपक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. या फोटोंमध्ये मंगळावर बर्फाने भरलेले खड्डे, वेगवेगळ्या आकाराचे दगड, डोंगर आणि इतरही अनेक गोष्टी आढळल्या आहेत.


अंतराळात कोणतीही वेगळी किंवा विचित्र गोष्टी सापडली की त्यांच्या संबंध एलियन्ससोबत जोडला जातो. त्यामुळे मंडळावरील या घटनेला एलियन्ससोबत जो़डले जात आहे. पण, नासाने या फोटोंबाबत म्हटले आहे की, आपण अशा कथांपासून दूर राहिले पाहिजे. अधिक संशोधनात या संदर्भातील ठोस माहिती समोर येईल. तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवणे आणि अफवा पसरवणं चुकीचं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या