Elon Musk on Tesla : टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Electric Car) लवकरच भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता भारतीयांची टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी प्रतिक्षा लांबणीवर गेली आहे. टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी टेस्लाची इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारपेठेत आणण्याची योजना तुर्तास पुढे ढकलली आहे. यामुळे भारतीयांनी टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


रॉयटर्सच्या बातमीनुसार, टेस्ला इंक Ltd ने भारतातील कार शोरूम शोधण्याची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे. त्याचबरोबर भारतात काम करणाऱ्या त्यांच्या टीममधील अनेक जणांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले की, टेस्ला कंपनीने भारतीय बाजारपेठेत टेस्ला आणण्याची योजना पूर्णपणे थांबवली आहे.


आयात शुल्कावरून टेस्ला आणि सरकार आमनेसामने
आयात शुल्क कमी करण्याबाबत टेस्ला आणि सरकार यांच्यातील करार बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे. या वाटाघाटीवर सुमारे एका वर्षाहून अधिक काळापासून बोलणी सुरु आहेत. मस्क यांची इच्छा आहे की, सरकारने भारतात टेस्लाचा कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करातून सूट द्यावी. यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी आणि प्रतिसाद तपासता येईल. 


मात्र, टेस्लाला भारतात कार विकायच्या असतील तर भारतात कारखाना सुरू करावा लागेल, असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी टेस्ला भारत सरकारच्या PLI योजनेचा लाभ घेऊ शकते. चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकल्या जाणार नाहीत, असं भारतानं स्पष्ट केलं आहे.


वार्षिक अर्थसंकल्पात कोणतीही शिथिलता नाही
रॉयटर्सच्या मते, कंपनीने भारतात टेस्ला कार लाँच करण्यासाठी 1 फेब्रुवारी ही अंतिम मुदत ठेवली होती. या दिवशी भारत सरकार आपला वार्षिक अर्थसंकल्प सादर करते. टेस्ला कंपनीला भारत सरकारच्या अर्थसंकल्पात काही बदल करते का हे पाहायचे होते. मात्र वार्षिक अर्थसंकल्पात कोणतीही शिथिलता नाही. यामध्ये अयशस्वी झाल्यामुळे कंपनीने टेस्ला कार भारतात आणण्याची योजना तुर्तास थांबवली आहे. 


या संपूर्ण घटनेबाबत एलॉन मस्क यांनी एक ट्विट केले होते की, 'टेस्लासमोर भारत सरकारकडून अनेक अडचणी आहेत. यानंतर अनेक राज्य सरकारांनी टेस्लाला कारखाना उभारण्यासाठी आमंत्रणं दिलं होतं. यामध्ये पश्चिम बंगाल, तेलंगणा, पंजाब, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा समावेश आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI