VP Naidu In UAE : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) दिवंगत राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनावर भारताकडून शोक व्यक्त करण्यासाठी अबुधाबी येथे पोहोचले आहेत. अनेक वर्ष आजारांनी त्रस्त शेख खलिफा यांचं शुक्रवारी निधन झालं.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी उपराष्ट्रपाती व्यंकय्या नायडू यांच्या संयुक्त अरब अमिरातीत पोहोचल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू संयुक्त अरब अमिरातीचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अबुधाबी येथे पोहोचले आहेत.'


परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी माहिती देत उपराष्ट्रपतींच्या संयुक्त अरब अमिराती येथील दौऱ्याची माहिती दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं की, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 15 मे रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा यांच्या निधनावर भारताकडून शोक व्यक्त करण्यासाठी दौरा करणार आहेत.


राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेख खलिफा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.


भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
दिवंगत शेख खलिफा यांच्या सन्मानार्थ शनिवार एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, शेख खलिफा बिन जायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वात भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंध दृढ झाले. दोन्ही देशांतील नागरिकांना याचा फायदा झाला. त्यांनी युएईमधील भारतीय समुदायासाठी अनेक कामं केली आहेत.'


मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देश नवीन आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रात त्यांचे ऐतिहासिक आणि व्यापक धोरणात्मक संबंध पुढे सुरु ठेवतील.


महत्त्वाच्या इतर