एक्स्प्लोर
Advertisement
फ्लोरिडा विमानतळावर तरुणाचा अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू
फ्लोरिडा: अमेरिकेतील फ्लोरीडामध्ये 20 वर्षीय तरूणाने फोर्ट लॉडरडेल विमानतळावर अंदाधुंद गोऴीबार केला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू, तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी या हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. मात्र त्याने हल्ला का केला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या हल्ल्यानंतर विमानतळ सील केलं गेलं. हा गोळीबार झाला त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे माजी सेक्रेटरी विमानतळावरच होते.त्यांनी ट्विटरवरून या घटनेची माहिती देताच, प्रवाशांमध्ये खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय वेळेनुसार मध्यरात्री 11.30 वाजता घडली. टर्मिनल-2 च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये ही घटना घडली असून, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने विमानतळ सील केले. या गोळीबारावेळी सर्व प्रवाशी टरमॅकमध्ये एकत्रित झाले होते. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप स्थळी हलवण्यात आलं.
दरम्यान, गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
क्राईम
भारत
Advertisement