Dubai Heavy Rain : संयुक्त अरब अमिराती अचानक हवामानात मोठा बदल झाला आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुबईत फक्त काही तासात पडला वर्षभराचा पाऊस पडला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील बदललेल्या हवामानामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. दुबईसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एअरपोर्ट आणि मॉल पाण्याखाली गेले आहेत. 


संयुक्त अरब अमिराती धो-धो पाऊस


सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवार सकाळपर्यंत यूएईच्या अनेक भागांमध्ये धो-धो पाऊस सुरू होता. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस कोसळला यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दुबईत अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुबईतील रस्ते, घरे आणि मॉलमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.


मुसळधार पावसामुळे दुबईची तुंबई


मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने देशातील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला असून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


काही उड्डाणे उशीर होत आहेत तर काही दुसऱ्या दिशेने वळवली जात आहेत. सध्या अतिशय आव्हानात्मक परिस्थिती असून प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत असं दुबई एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं. 


पाऊस आणि वादळाच्या इशाऱ्यानंतर  इनबाउंड आणि आउटबाउंड अशी 500 हून अधिक उड्डाणे विलंबाने आहेत, दुसऱ्या दिशेने वळवण्यात आली आहेत किंवा ती रद्द करण्यात आली आहेत.


पाहा व्हिडीओ : मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं






अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 18 जणांचा मृत्यू


मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस (Rain News) झाला. UAE मध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलेलं दिसत आहे. जोरदार पाऊसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत. इतकंच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबई आणि अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा UAE हवामान विभागाने दिला आहे.


वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम


अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन दुबईच्या वाहतुकीवर (Dubai Transport) सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही (Air Travel) विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळाच्या रनवेवर पाणी भरलं आहे. त्यामुळे अनेक विमान उड्डाणेही रद्द करावी लागली आहेत. दुबईला येणारी विमान उड्डाणे वळवण्यात आली आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबद्दल लोकांना सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Heat Wave : अंगाची लाहीलाही! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, या भागात पावसाची शक्यता