Iran Attack on Israel : इराणने (Iran) इस्रायलमधील (Israel) हल्ला चढवल्यानंतर तणावची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलमध्ये इराणकडून हल्ला करण्यात येत असताना अनेक भारतीयांसह इतर देशांतील नागरिकही तेथे अडकून आहेत. इराणने शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने इस्रायलवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये सध्या अत्यंत तणावाची परिस्थिती आहे. 


शांत राहा, सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करा


इस्रायलमधील भारतीय दूतावासाने रविवारी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शन सूचनेमध्ये इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहनही भारतीय दूतावासाने केलं आहे. 


इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचं आवाहन


भारतीय दूतावासाने पुढे म्हटले आहे की, भारतीय दूतावास परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकारी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या संपर्कात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.




वाढत्या तणावावर भारताची प्रतिक्रिया


इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानंतर भारताची प्रतिक्रियाही समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानंतर भारताची प्रतिक्रियाही समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वामुळे आम्ही चिंतित आहोत. यामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. आम्ही तात्काळ डी-एस्केलेशन, संयम आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन करतो.