न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झाल्याने तब्बल 30,000 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तर यामध्ये 700 जणांचा मृत्यू झाल्याचंही एका संशोधनातून समोर आलं आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 18 रॅली घेतल्या. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात समोर आलं आहे.


स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान झालेल्या 18 रॅली निघाल्या. यामध्ये जवळपास 30 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली. संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि ज्यांचा मृत्यू झाला, ते ट्रम्प यांची रॅली जिथे झाली, तेथे गेलेच असतील असं नाही.


यंदाची अमेरिकेची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक खर्चिक, तब्बल 11 बिलियन डॉलर्स खर्चाचा अंदाज


स्टॅमफोर्ड युनिव्हसिटीच्या अहवालाबाबतच्या एका ट्विटर पोस्टवर डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडेन यांनी म्हटलं की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना तुमची काळजी नाही. त्यांना तर त्यांच्या समर्थकांचीही चिंता नाही.


US election 2020 : शेवटच्या वादविवादात जो बायडन यांची ट्रम्प यांच्यावर सरशी; पण, मतदानावर परिणाम होईल?


शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं की, अमेरिकेतील 87 दशलक्षाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 2 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिवेंशन (सीडीसी) यांनी म्हटलं की मोठ्या सभांमध्ये जेथे लोक मास्क लावत नाहीत आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवत नाहीत, तेथे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. सीडीसीने म्हटले आहे की "अशा मोठ्या सभांमुळे करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो आणि कोरोनाविरुद्धच्या लढाई कमजोर होते.