लंडन: जेम्स बाँड ही व्यक्तीरेखा पडद्यावर साकारून ती अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते सर शॉन कॉनेरी याचं आज निधन झालं आहे. वयाच्या 90 वर्षी या ज्येष्ठ अभिनेत्याने झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या परिवाराने दिली आहे.


सर शॉन कॉनेरी यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 साली स्कॉटलंडच्या  एडिनबर्ग शहरातील फाउंटनब्रिज या परिसरात झाला.


स्क़ॉटीश अभिनेते सर शॉन कॉनेरी यांची ओळख जेम्स बॉन्ड चित्रपटातील नायक अशी होती.  त्यांनी अनेक दशके हॉलिवूडच्या चित्रपटात काम केलं. त्यांनी अनेक दशके हॉलिवूडच्या चित्रपटात काम केलं. रशिया वि्थ लव (1963) गोल्डफिंगर (1964),थंडरबॉल (1965) आणि यु ओन्ली लाईव्ह ट्वाइस (1967) अशा काही चित्रपटात त्यांनी काम केले. 1988 साली 'द अनटचेबल' या चित्रपटात एका आयरिश पोलीसाची भूमिका त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांना मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना दोन बाप्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. 1962 साली "Mr. NO" या त्यांच्या पहिल्या जेम्स बॉंड चित्रपटात सर शॉन कॉनेरी यांनी एका गुप्तहेराची भूमिका वठवलेली. तेंव्हापासून ते प्रसिध्दीच्या झोतात आले . त्यांचे चाहते त्यांनी प्रेमाने 007 असेही म्हणायचे. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.


स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचे समर्थक


सर शॉन कॉनेरी हे स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचे दीर्घकालापासून समर्थक होते. त्यांनी 2014 साली एका मुलाखतीत सांगितले होते की ते स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचे समर्थक आहेत. स्कॉटलंडने युनायटेड किंगडमपासून वेगळे व्हावे अशी त्यांची भूमिका होती.