Donald Trump Tariff On India: भारताला धक्का देत अमेरिकेची पाकिस्तानसोबत हातमिळवणी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, कधीतरी...
Donald Trump Tariff On India: एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.

Donald Trump Tariff On India: अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25 टक्के आयातशुल्क (Donald Trump Tariff On India) लावण्यात आले आहे. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः जे आयातशुल्क लावतो, ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं. तसंच, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च तेल आयात करतो, एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो, हे सगळं अजिबात ठीक नाही. त्यामुळे भारत आता 25 टक्के आयातशुल्क भरणार, आणि त्याव्यतिरिक्त दंडही आकारला जाणार, आणि हे वाढीव शुल्क 1 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी- (US will develop massive oil reserves in Pakistan)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) सोशल मीडियाद्वारे सांगितले की अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे. या अंतर्गत, दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून भारताला बाजूला केले आहे. तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेने पाकिस्तानशी करार केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केलीय. एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला ही सुविधा देणार आहे.
Trump announces US will develop "massive" oil reserves in Pakistan, says they might sell to "India some day"
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2025
Read @ANI story | https://t.co/tbwc0iEQLN#US #Pakistan #India #Trump pic.twitter.com/hswfpeeqRW
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
आम्ही पाकिस्तानशी एक करार केला आहे, ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या प्रचंड तेल साठ्याच्या विकासावर एकत्र काम करतील. आम्ही एक तेल कंपनी निवडत आहोत जी या भागीदारीचे नेतृत्व करेल. कदाचित पाकिस्तान कधीतरी भारताला तेल विकेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय-
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला ट्रम्प यांनी मुदतवाढ 1 ऑगस्टपर्यंत दिली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती होत नव्हती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवरुन भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारतानं लष्करी शस्त्र रशियाकडून खरेदी केलेली आहेत. याशिवाय भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल रशियाकडून खरेदी करतो. चीननंतर भारत रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे. रशियाच्या यूक्रेनवरील कारवाईचा आधार घेत ट्रम्प भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतला आहे.
























