Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव सुरू आहे. जगभरातील 212 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 94,261 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 6,784 ने वाढली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 38 लाख 18 हजार 779 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 64 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 12 लाख 98 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


जगभरातील देशांमधील परिस्थिती :


जगभरातील एकूण कोरोनाच्या रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर एक चतुर्थांश कोरोना बाधितांचा मृत्यू अमेरिकेमध्ये झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेन कोविड-19मुळे सर्वाधिक प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे 25,857 लोकांचा मृत्यू झाला असून 253,682 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 29,684 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 214,457 एवढी आहे. त्यानंतर यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देश सर्वाधिक प्रभावित आहेत.


अमेरिका : एकूण रूग्ण 1,262,875, एकूण मृत्यू 74,794
स्पेन : एकूण रूग्ण 253,682, एकूण मृत्यू 25,857
इटली : एकूण रूग्ण 214,457, एकूण मृत्यू 29,684
यूके : एकूण रूग्ण 201,101, एकूण मृत्यू 30,076
फ्रान्स : एकूण रूग्ण 174,191, एकूण मृत्यू 25,809
जर्मनी : एकूण रूग्ण 168,162, एकूण मृत्यू 7,275
रूस : एकूण रूग्ण 165,929, एकूण मृत्यू 1,537
टर्की : एकूण रूग्ण 131,744, एकूण मृत्यू 3,584
ब्राझील : एकूण रूग्ण 126,148, एकूण मृत्यू 8,566
इराण : एकूण रूग्ण 101,650, एकूण मृत्यू 6,418
चीन : एकूण रूग्ण 82,883, एकूण मृत्यू 4,633


10 देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधित


जर्मनी, रूस, ब्राझीलसह नऊ देश असे आहेत, जिथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख पार पोहोचली आहे. या यादीमध्ये आता इराणचाही समावेश झाला आहे. इराणमध्ये 1680 नवीन कोरोना बाधित आढळून आल्यामुळे तेथील एकूण रुग्णांची संख्या एक लाख पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 75 हजारांवर पोहोचली आहे. चीन कोरोना बाधित टॉप-10 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.


संबंधित बातम्या : 


लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी


कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट येण्याची शक्यता, जर्मनीच्या नामांकित RKI संस्थेचा इशारा

कोरोनाची लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा


Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअ‍ॅक्टीव्ह होतो का?