Coronavirus | अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अमेरिकेत दररोज 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. मंगळवारी 2335 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, त्याआधी एक दिवस अगोदर 1300 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, अमेरिकेतील मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे. संपूर्ण जगभरातील कोरोना बाधितांपैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण हे अमेरिकेत आहेत. येथे 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कैलिफॉर्निया अमेरिकेतील या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
अमेरिकेमध्ये आतापर्यंत 72,271 लोकांचा मृत्यू
वर्ल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत 12 लाख 37 हजार 633 इतकी झाली आहे. तर एकूण 72,271 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वाधिक 330,139 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात 25,204 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर न्यूजर्सीमध्ये 131,705 कोरोना बाधितांपैकी 8,292 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त मैसाचुसेट्स, इलिनॉयस ही शहरंही सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी
'एकता' कोविड-19 वरील रामबाण उपाय आहे : डब्ल्यूएचओ (WHO)
डब्ल्यूएचओचे प्रुमख ट्रेडोस अधनोम घेब्रेयसस यांनी संपूर्ण जगाला एकत्र येऊन कोविड-19 ला हरवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ' 'एकता' कोविड-19 वरील रामबाण उपाय आहे.' ट्रेडोस अधनोम घेब्रेयसस म्हणाले की, कोविड-19 संपूर्ण जगासाठी इशारा आहे, त्याचबरोबर संपूर्ण जगासमोर एक सारखं भविष्य ठेवण्याची एक संधी आहे. त्यांनी युरोपिय आयोगाद्वारा आयोजित कोविड-19 वैश्विक प्रतिक्रीयेच्या आंतराष्ट्रीय संम्मेलनात 7.4 अरब यूरो एवढी मदत गोळा केल्याबद्दल कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी जगाला कोरोनाला हरवण्यासाठी उपाय शोधण्याचं आवाहन दिलं आहे. तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीचं रक्षण होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट येण्याची शक्यता, जर्मनीच्या नामांकित RKI संस्थेचा इशारा
कोरोनाची लस तयार, लवकरच पेटंट मिळवणार; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअॅक्टीव्ह होतो का?