नवी दिल्ली : कोविड-19 विरोधात अॅन्टीबॉडीज विकसीत केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. म्हणजेच एका अर्थाने इस्रायलनेही कोविड-19 वर लस विकसीत केल्याचा दावा केला आहे. या पुर्वी ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, चीन अशा काही देशांनी, तेथील संशोधन संस्था लवकरच कोविड-19च्या लसी बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. इस्रायल इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी कोविड-19 विषाणूच्या अॅन्टिबॉडीज विकसीत केल्या असल्याची माहिती दिली आहे. या अॅन्टिबॉडीज शरिरातील विषाणूंवर हल्ला करतात आणि त्या विषाणुंना निष्क्रीय करतात. अशी माहिती इस्रायलचे संरक्षणमंत्री नेफ्थाली बेनेट्ट यांना सोमवारी 4 रोजी आयआयबीआरच्या शास्त्रज्ञांनी दिली. जेरुसलेम पोस्टने यांसदर्भातील वृत्त दिले आहे.


आयआयबीआर मार्फत लवकरच लस विकसीत करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास नेली जाणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयामार्फत याचे पेटेंन्ट करून बाजारात आणण्यासाठी कायदेशीर करारही केले जातील, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.


गेल्याच महिन्यात आयआयबीआरने उंदरांवर या अॅन्टिबॉडीजरूपी लसीचे परिक्षण करत असल्याची घोषणा केली होती. याशिवाय संशोधनात मदत म्हणून नोवेल कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झालेल्या रूग्णांचा प्लाज्मा संकलित करण्याची प्रक्रिया देखील आयआयबीआर करत आहे. मिगवॅक्स ही दूसरी इस्रायल संस्था, मिगल गलिली रिसर्च इन्स्टिट्युटसोबत कोरोना वॅक्सीनच्या विकासाचा पहिला टप्पा लवकरचं पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली आहे.


आज संपूर्ण जगच कोरोना महामारीने त्रस्त आहे. या व्हायरसने आजवर 2 लाख 52 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. या व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 36 लाख 45 हजारावर गेली आहे. तर अंदाजे 12 लाख लोकं या आजारातून ठीक झाली आहेत. जगात या व्हायरसने सर्वात प्रभावित देश अमेरिका असून मृतांची संख्या 70 हजांरा जवळ पोहोचली आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | जगभरात 36 लाख 40 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त, तर मृतांची संख्या अडिच लाख पार


Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअ‍ॅक्टीव्ह होतो का?

चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना व्हायरसचा प्रसार, आमच्याकडे पुरावे; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचाही दावा


लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी