Coronavirus | कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 10 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा 4528ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 65 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 81 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे.
जगभरात कुठे किती रुग्ण, किती मृत्यू?
कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 19 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतातील कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.
अमेरिका : एकूण रुग्ण 1,881,205, एकूण मृत्यू 108,059
ब्राझील : एकूण रुग्ण 556,668, एकूण मृत्यू 31,278
रूस : एकूण रुग्ण 423,741, एकूण मृत्यू 5,037
स्पेन : एकूण रुग्ण 287,012, एकूण मृत्यू 27,127
यूके : एकूण रुग्ण 277,985, एकूण मृत्यू 39,369
इटली : एकूण रुग्ण 233,515, एकूण मृत्यू 33,530
भारत : एकूण रुग्ण 207,191, एकूण मृत्यू 5,829
फ्रान्स : एकूण रुग्ण 189,220, एकूण मृत्यू 28,940
जर्मनी : एकूण रुग्ण 184,091, एकूण मृत्यू 8,674
पेरू : एकूण रुग्ण 170,039, एकूण मृत्यू 4,634
पाहा व्हिडीओ : जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याची अमेरिकेची घोषणा
13 देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण
ब्राझील, रूस, स्पेन, युके, इटली, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सात देश असे आहेत, जिथे एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 13 देशांमध्ये एकूण 48 लाख रुग्ण आहेत. सहा देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे देश आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-16 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-7 देशांमध्ये झाला आहे.
संबंधित बातम्या :
व्हाईट हाऊसपर्यंत हिंसाचाराची झळ, डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलवलं!
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडले, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेत हिंसाचार! जवळपास 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू, हजारो लोकांना अटक