US violence | अमेरिकेत हिंसाचार! जवळपास 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू, हजारो लोकांना अटक
अमेरिकेतील हिंसाचारात आतापर्यंत अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसचे 60 कर्मचारी जखमी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिंग्टनमध्ये आंदोलक मोठ्या संख्येने व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळा होऊन घोषणाबाजी करु लागले. आंदोलकांनी पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पोलिसांवर फेकल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे गोळे फेकले. तर आंदोलकांनी व्हाईट हाऊसजवळ असलेल्या गाड्यांला आग लावली. पोलीस आणि विशेष सेवेच्या अधिकारी या गाड्यांचा वापर करतात.
आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की, आरोप फारसे कठोर नाहीत. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्यात यावेत.
जॉर्ज फ्लाईडच्या मानेवर आपला गुडघा ठेवणारा माजी पोलीस अधिकाऱ्यावर थर्ड-डिग्री मर्डर आणि हत्येचे आरोप लावण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या मिनेपॉलिसमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा या कृष्णवर्णीय व्यक्तीला पकडलं होतं, तेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर मिनेपॉलिसमध्ये हिंसाचार उफाळला आणि तो अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये पसरला.
अमेरिकेतील सॅन फ्रांन्सिस्को शहरातून आंदोलनकर्त्यांनी अनेक स्टोर्स लूटल्याचे फोटो समोर आले आहेत.
लंडन, न्यूझिलंडसह इतर अनेक देशांमध्येही हजारो लोक जॉर्ज फ्लॉईलच्या समर्थनात आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.
अमेरिकेत सध्या सुरु असलेला हिंसाचार मागील अनेक दशकांपासूनचा सर्वात मोठा हिंसाचार मानला जात आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा हिंसाचार अमेरिकेतील कमीत कमी 140 शहरांपर्यंत पसरला आहे.
काही आंदोलनांनी हिंसक रुप धारण केल्यानंतर कमीत कमी 26 राज्यांमध्ये नॅशनल गार्डच्या सैनिकांना तैनात करण्यात आलं.
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या हिंसाचाराची झळ थेट व्हाइट हाउसपर्यंत पोहोचल्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आता हा हिंसाचार यांमुळे अमेरिकेतील वातावरण अशांत झालं आहे. तसेच वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीसह अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. पाहूयात या हिंसाचाराचं वास्तव दाखवणारे काही फोटो...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -