Coronavirus | जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगात जवळपास 80 लाख कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत साडे चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 79 लाख 84 हजार 432 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 4 लाख 357 हजार 177 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 04 हजार 373 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 60 टक्के रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 45 लाखांहून अधिक आहे.


जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?


कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.


अमेरिका : एकूण रुग्ण 2,162,144, एकूण मृत्यू 117,853
ब्राझील : एकूण रुग्ण 867,882, एकूण मृत्यू 43,389
रूस : एकूण रुग्ण 528,964, एकूण मृत्यू 6,948
भारत : एकूण रुग्ण 333,008, एकूण मृत्यू 9,520
यूके : एकूण रुग्ण 295,889, एकूण मृत्यू 41,698
स्पेन : एकूण रुग्ण 291,008, एकूण मृत्यू 27,136
इटली : एकूण रुग्ण 236,989, एकूण मृत्यू 34,345
पेरू : एकूण रुग्ण 229,736, एकूण मृत्यू 6,688
जर्मनी : एकूण रुग्ण 187,671 , एकूण मृत्यू 8,870
इराण : एकूण रुग्ण 187,427, एकूण मृत्यू 8,837


8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण


ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोतली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 1.17 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा कोरोना बाधित टॉप-4 देशांच्या यादीत समावेश झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


'कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या सीमेवर कुरापती', तिबेटच्या राष्ट्रपतींचा चीनवर गंभीर आरोप


'संकटाच्या काळात आशावादी राहा'; गूगल सीईओ सुंदर पिचई यांचा विद्यार्थांना कानमंत्र


न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा