वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 321,626 रुग्ण आहेत. तर 9,199 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 150,101 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 162,326 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,142,224 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 117,527 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 850,796 कोरोनाबाधित आहेत तर 42,791 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 41,662 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 294,375 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,301 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 236,651 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 2,142,224, मृत- 117,527
- ब्राझील: कोरोनाबाधित- 850,796, मृत- 42,791
- रशिया: कोरोनाबाधित- 520,129, मृत- 6,829
- भारत: कोरोनाबाधित- 321,626 , मृत- 9,199
- यूके: कोरोनाबाधित- 294,375, मृत- 41,662
- स्पेन: कोरोनाबाधित- 290,685, मृत- 27,136
- इटली: कोरोनाबाधित- 236,651, मृत- 34,301
- पेरू: कोरोनाबाधित- 220,749, मृत- 6,308
- जर्मनी: कोरोनाबाधित- 187,423, मृत- 8,867
- इरान: कोरोनाबाधित- 184,955, मृत- 8,730
8 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु हे आठ देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.