नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे दहा लाखांहून अधिक जण कोरोनाग्रस्त आहेत. तर 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी द्वारे गुरुवारी रात्री जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर एएफपी द्वारे काढण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 188 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग कमीत कमी 10,00,036 रूग्ण समोर आले आहेत. तर आतापर्यंत 51,718 लोकांचा मृत्यू झाला आहे.


वर्ल्डोमीटर, जे कोरोना व्हायरसच्या आकड्यांची माहिती देत असते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10,15,059 लोकांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे. तर 53,167 लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, जगभरात 212,035 लोक कोरानामुक्त झाले आहेत.


अमेरिकेत परिस्थिती गंभीर


जगभरात महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत परिस्थिती गंभीर असून 244,877 जण कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत 6,070 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त 10,403 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


पाहा व्हिडीओ : जगभरात 50हजाराहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू, इटलीत 13900 तर स्पेनमध्ये 10000हून अधिक मृत्यू



इटलीमध्ये 13,000 पेक्षा जास्त मृत्यू


इटलीमध्ये 115,242 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर एकूण 13915 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर 18278 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


स्पेनमध्ये 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू


स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसने 112,065 ग्रासले आहेत. तर एकूण 10,348 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, 26,743 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


फ्रान्समध्ये 5000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू


फ्रान्समध्ये 59,105 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर 5387 लोकांचा मृत्यू झाला आहे.


भारतात 2500हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह


भारतात 2543 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 189 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


संबंधित बातम्या : 


Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना


Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा

Coronavirus Outbreak | अमानवी पाकिस्तान! लॉकडाऊनच्या काळात हिंदूंना अन्न-धान्य देण्यास नकार


Coronavirus | कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, जर्मनीत अर्थमंत्र्याची आत्महत्या


Coronavirus | स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचं निधन; शाहीपरिवारातील कोरोनाचा पहिला बळी