इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसमुळे अक्षरश: हाहाकार उडाला आहे. जगातील प्रत्येक देश सर्व काही लवकरात लवकर ठीक होण्यसाठी प्रार्थना करत आहे. पण या दरम्यान पाकिस्तानचा अमानवी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानातही लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. या दरम्यान कराचीमध्ये पाकिस्तान प्रशासनाने हिंदूंना अन्न-धान्य देण्यास नकार दर्शवला आहे.

कराचीच्या केरेहडी घोथ या भागात हजारांहून अधिक लोक अन्न-धान्य आणि रोजच्या गोष्टी घेण्यासाठी जमले होते. सरकारकडून गरीब कामागारांना जिवनावश्यक वास्तूंचं वाटप करण्यात येणार होतं. पण तिकडे गलेल्या प्रत्येक हिंदूंच्या हाती निराशा आली. यावेळी हिंदूंना तिकडून जाण्यास सांगून हे अन्न-धान्य केवळ मुसलमानांसाठीचं असल्याचं सागितलं.

Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच

एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून तुम्हाला अन्न-धान्य दिले जाणार नाही कारण हे केवळ मुसलमानांसाठी असल्याचं हिंदूंना सांगण्यात आलं.

राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी सांगितलं की, अल्पसंख्यांकांना आता अन्न-धान्यांबबात गंभीर संकट ओढवणार आहे. तसेचं मिर्झा यांनी सिंधमधील मानवतावादी संकटाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उशीर न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून जगभरात एकूण 7 लाख 21 हजार 412 कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत 33 हजार 956 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 51 हजार 4 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्पेनचा दुसरा क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 6803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काल स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये शाही परिवारातील हा पहिला मृत्यू होता. अमेरिकेतही कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2484 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 47 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जगभरातील जवळपास 177 देश कोरोनाच्या सावटाखाली आहेत.

होमिओपॅथी खरंच कोरोनावर गुणकारी आहे? प्रख्यात उद्योगपती राजीव बजाज यांचं विश्लेषण



संबंधित बातम्या : 
CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा