नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 लाख 35 हजार 571 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 47 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान, जगभरात 1 लाख 94 हजार 260 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
इटलीमध्ये 13000 पेक्षा जास्त मृत्यू
इटलीमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. येथे जवळपास 13,155 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त येथे 110574 लोकांना कोरोना व्हायरचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, येथे 16847 लोक या महामारीमुळे रिकव्हर झाले आहेत. परंतु, जगभरात 47 हजारपेक्षा अधिक मृत्यूंमुळे सर्वाधिक आकडा इटलीमध्ये आहे.
अमेरिकेमध्ये 5000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
अमेरिकेमध्ये 5109 लोकांचा मृत्यू या महामारीमुळे झाला आहे. तर 215,071 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 5005 क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मृत्यूचं तांडव, 24 तासात एक हजारांहून अधिक बळी
स्पेनमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग
स्पेनमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. येथे आतापर्यंत 110,574 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे एकूण 9387 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 22 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतातही कोरोनाचा फैलाव
भारतातही कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2014 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 41 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर 169 लोक बरे झाले आहेत.
जगभरात कोरोनाचा फैलाव करणाऱ्या चीनमधील परिस्थिती
चीनमध्ये एकूण 81554 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये नवे रूग्ण सापडलेले नाहीत. तर मृतांचा आकडाही समोर आला नाही. चीनमध्ये परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्येही सांगण्यात येत आहे. दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत 3312 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात करून 76,238 लोक बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus Outbreak | अमानवी पाकिस्तान! लॉकडाऊनच्या काळात हिंदूंना अन्न-धान्य देण्यास नकार
Coronavirus | कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, जर्मनीत अर्थमंत्र्याची आत्महत्या