मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही याला हातभार लावत आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तर, या काळात कोणी उपाशी राहु नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. राज्य सरकारने देखील कोरोनाशी दोनहात करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

रतन टाटांकडून दीड हजार कोटींची मदत
दानशूर व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे 500 कोटींची मदत जाहीर केली होती. यानंतर काही वेळातचं टाटा सन्सने आणखी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली. म्हणजे एकूण दीड हजार कोटी. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. ही मदत कोरोनाबाधितांसाठी असणार आहे. टाटा ट्रस्टने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा, अनिल अगरवाल यांनीही पुढाकार घेत मदत केली आहे.

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार

कुणी आणि कशी केलीय मदत
भाजप खासदारांची खासदार फंडातून केंद्रीय सहाय्यता निधीत एक कोटींची मदत

अभिनेता अक्षय कुमारकडून केंद्रीय सहाय्यता निधीत 25 कोटींची मदत

कोल्हापूर – मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 2 कोटींची मदत जाहीर.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदार निधीतून दिला दीड कोटीचा निधी

शिर्डी – शिर्डी साई संस्थानाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत.

राष्ट्रवादी – राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी 1 महिन्याचं वेतन केंद्रसरकारच्या मदतनिधीला देणार.

शिवसेना – सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार.

पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या फंडातुन कोरोना प्रतिबंधात्मक उपायासाठी पन्नास लाखाचा निधी जाहीर.

'बजाज' ग्रुपकडून १०० कोटी..तर युनिलिव्हरकडूनही 100 कोटींची मदत देण्याची माहिती.

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे.

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदत केली.

जेजूरी मार्तंड देवस्थानाकडून ससून हॉस्पीटलच्या आसोलेशन वार्डला 51 लाखांची मदत

अभिनेता वरुण धवनकडून केंद्रीय सहाय्यता निधीस 55 लाखांची मदत

बीसीसीआयकडून पंतप्रधान सहाय्यता निधीस 51 कोटींची मदत

पंकजा मुंडेंकडून पंतप्रधान सहाय्यता निधीस 25 लाखांची मदत

मुख्यमंत्र्यांकडून मदतीसाठी आवाहन
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300