हैदराबाद : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासमोर अख्खं जग हतबल झालं आहे. अशातच जगासह देशातील कोरोना बाधिंतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अशातच हैदराबाद युनिव्हर्सिटीमधील बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटने कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी या औषधाला 'T cell एपिटोप्स' असं नाव दिलं असून हे औषध महाभयंकर कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सक्षम असल्याचा दावा हैदराबाद युनिव्हर्सिटीकडून केला जात आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देण्यात आली.



युनिव्हर्सिटीने केलेल्या या औषधाबाबत माहिती देण्यासाठी एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्रकात सांगण्यात आलं आहे की, 'संरचनात्मक आणि असरंचनात्मक प्रोटीनला नोवेला कोरोना व्हायरस-2 पासून एक्सपरिमेंटल टेस्टिंगसाठी वेगवेगळं करण्यात आलं आहे. हे वॅक्सिन छोटे कोरोना व्हायरस पेन्टाइड्स आहेत. यांचा अणुंच्या पेशींद्वारे उपयोग केला जाऊ शकतो. या व्हायरस पेन्टाइड्सला नुकसान पोहोचवणाऱ्या पेशी नष्ट करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.


पाहा व्हिडीओ : हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो : संशोधक



सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय हा, सोशल डिस्टंसिंग आहे. पत्रकामध्ये सांगण्यात आल्यानुसार, हे औषध तयार होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. कारण या औषधावर अजून काम करणं गरजेचं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली संपूर्ण जग आहे.


भारतातही कोरोना व्हायरस फोफावत जात आहे. 29 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.


संबंधित बातम्या :


ndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार


Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार


लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर