नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
डिसेंबरमध्ये चीनमध्ये पहिला कोरोना बाधित आढळून आला होता. चीन केंद्र असलेल्या या जीवघेण्या व्हायरसमुळे सर्वाधित मृत्यू चीनमध्ये नाहीतर इटलीमध्ये झाले आहेत. आतापर्यंत कोरोमामुळे सर्वाधित मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चीन सर्वात पहिल्या स्थानावर होता. परंतु, इटलीमध्ये या व्हायरसचा प्रकोप जास्त पाहायला मिळत असून इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे.
पाहा व्हिडीओ : Majha Katta | Rajesh Topes | Coronavirus | लोकांनी ऐकलं नाही तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन : राजेश टोपे
आतापर्यंत या व्हायरसमुळे 10,041 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून त्यांची संख्या 3405 एवढी आहे. तर कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत 3248 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतरही देशांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. इराण 1284, अमेरिका 214 आणि स्पेनमध्ये 831 लोकांना मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. तर जगभरात 245,073 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
22 मार्चला भारतात 'जनता कर्फ्यु'
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus | सिंगापूरमध्ये अडकलेल्या राज्यातली विद्यार्थ्यांची सुटका
भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही
भारतात गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिवांनी सांगितलं की, भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही आहे. घाबरण्याची नाहीतर जागरूक राहण्याची गरज आहे. 21 मार्चला एअर इंडियाचं विमान रोममध्ये फसलेल्या भारतीयांना आणण्यासाठी रवाना होणार असून त्यांना घेऊन 22 मार्चला पुन्हा भारतात येणार आहे.
संबंधित बातम्या :
#JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा
Coronavirus | मलेरियाच्या औषधाने होणार कोरोना व्हायरसवर उपचार, अमेरिकेची मंजुरी
Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख