PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातला निवडणुकीच्या वर्षात पंतप्रधानांकडून मोठी भेट मिळणार आहे. 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंतप्रधान मोदी विविध क्षेत्रातील 22 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान गांधीनगरमधील शाळांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधतील. त्यानंतर त्याचं लोकार्पण करतील. तसेच बनासकांठा येथील देवदार येथील बनास डेअरी कॉम्प्लेक्समध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. यानंतर, दुपारी 3.30 वाजता ते जामनगरमध्ये WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीनची पायाभरणी करतील.
गुजरातला 22 हजार कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण
कमांड अँड कंट्रोल सेंटर दरवर्षी 500 कोटींहून अधिक डेटा संच संकलित करते आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण परिणाम वाढवण्यासाठी व्यापक माहितीचे विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) आणि मशीन लर्निंग वापरून त्यांचे अर्थपूर्ण विश्लेषण करते. केंद्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ऑनलाइन उपस्थितीचा मागोवा घेण्यास मदत करते, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामाचे केंद्रीकृत सारांश आणि नियतकालिक मूल्यांकन करते. शाळांसाठी कमांड आणि कंट्रोल सेंटरला जागतिक बँकेने जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट पद्धतींपैकी एक म्हणून ओळखलं आहे. तसेच इतर देशांना देखील याबद्दल जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
बनासकांठा येथे नवीन डेअरी संकुलाचं उद्घाटन
पंतप्रधान 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 वाजता बनासकांठा जिल्ह्यातील देवदार येथे 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेले नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचं लोकार्पण करतील. नवीन डेअरी संकुल हा हरित क्षेत्रातील प्रकल्प आहे. हा प्रकल्प दररोज सुमारे तीन दशलक्ष लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल. यामध्ये सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेटचे उत्पादन करेल. तसेच बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या विविध उत्पादनांचे उत्पादन करेल, जे इतर अनेक देशांमध्ये निर्यात केले जातील. हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करेल. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल.
बनास कम्युनिटी रेडिओ स्टेशन
पंतप्रधान बनास कम्युनिटी रेडिओ स्टेशनचंही लोकार्पण करतील. या कम्युनिटी रेडिओ केंद्राची स्थापना शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वाची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी करण्यात आली आहे. या रेडिओ केंद्रामुळे सुमारे 1700 गावांतील पाच लाखांहून अधिक शेतकरी जोडले जातील, अशी अपेक्षा आहे. पालनपूर येथील बनास डेअरी प्लांटमध्ये दुध उत्पादनांसाठी विस्तारित सुविधा जनतेला समर्पित करतील. तसेच, गुजरातमधील दामा येथे उभारण्यात आलेला सेंद्रिय खत आणि बायोगॅस प्रकल्पाचं लोकार्पण करतील. पंतप्रधान खिमाना, रतनपुरा-भिलडी, राधनपूर आणि थावर येथे उभारण्यात येणाऱ्या 100 टन क्षमतेच्या चार गोबर गॅस प्लांटची पायाभरणी करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Lakhimpur Accident : भाजप आमदाराच्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उडवलं, दोघांचा मृत्यू
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha