China Plane Crash Update : चीनमधील ग्वांगझूजवळ अपघात झालेल्या चायना इस्टर्न 737-800 विमानातील सर्व 132 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी शनिवारी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. चीनच्या नागरी उड्डयन प्रशासनाचे उपसंचालक हू झेनजियांग यांनी सांगितले की, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांचे मृतदेह सापडले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
बऱ्याच प्रयत्नांनंतर सापडले दोन्ही ब्लॅक बॉक्स
चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हू झेजियांग यांनी सांगितले की, तपास पथकाचे ऑपरेशन जवळपास पूर्ण झाले आहे. तपासकर्त्यांनी डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटवली आहे. तपास पथकाला विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले आहेत. पहिला ब्लॅक बॉक्स तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर सापडला, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या चौथ्या दिवशी सापडला.
सोमवारी झाला होता अपघात
चीनच्या कुनमिंग शहरातून 21 मार्चला ग्वांगझूला जाणारे चायना इस्टर्न एअरलाइन्सचे बोइंग 737 प्रवासी विमान नैऋत्य चीनमध्ये कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात असलेल्या 132 प्रवासी आणि कर्मचारी सर्वांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने कारवाई करत शोध आणि बचाव मोहिमेचे आदेश दिले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तातडीने तपास करण्यात येत असून विमान वाहतूक क्षेत्र आणि लोकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Russia Ukraine War : युद्धादरम्यान जर्मनीकडून युक्रेनच्या पाठीशी, 100 मशीन गन आणि 1,500 क्षेपणास्त्रे युक्रेनमध्ये दाखल
- Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले
- ISRO New Launch : ISRO लवकरच लाँच करणार चांद्रयान-3, यावेळी नक्कीच यश मिळणार : डॉ. सिवन यांना विश्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha