China Artificial Moon : चीन (China) विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) क्षेत्रात सातत्याने मोठी कामगिरी करत आहे. 'कृत्रिम सूर्य' (Artificial Sun) बनवल्यानंतर आता चीननेही 'कृत्रिम चंद्र' (Artificial Moon) तयार केला आहे. चीनचे म्हणणे आहे की या कृत्रिम चंद्रामुळे विजेच्या खर्चात लक्षणीय घट होईल. हा चंद्र शून्य गुरुत्वाकर्षणाचा चंद्र आहे. रिपोर्टनुसार, चिनी वैज्ञानिकांनी या बनावट चंद्रावर चुंबकीय शक्तीची चाचणी केली. कृत्रिम चंद्र बनवण्यामागे अनेक उद्देश आहेत. भविष्यात चुंबकीय शक्तीवर चालणारी वाहने विकसित करणे आणि वाहतुकीची नवीन साधने शोधणे हे या मागचे पहिले उद्दिष्ट आहे. याशिवाय चीनला चंद्रावरही वस्ती स्थापन करायची आहे.


2022 वर्षाच्या अखेरीस मोठा प्रयोग
अहवालानुसार, चायना युनिव्हर्सिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीचे भू-तंत्रज्ञान अभियंता ली रुईलिन यांनी म्हटले आहे की, 2022 च्या अखेरीस ते या बनावट चंद्रामध्ये अत्यंत शक्तिशाली चुंबकीय शक्तीसह व्हॅक्यूम चेंबर तयार करतील, ज्याचा व्यास दोन फूट असेल. यानंतर दगड आणि धुळीने हे कक्ष भरून पृष्ठभाग चंद्रासारखा बनवला जाईल. पृष्ठभागाच्या यशस्वी प्रयोगानंतर हा प्रयोग चंद्रावर पाठवला जाईल. 2029 पर्यंत चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी संशोधन केंद्र उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे.


विजेचा प्रश्न सुटेल
या कृत्रिम चंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठ्या आपत्तीतही ब्लॅकआऊट होणार नाही. भूकंप आणि पुरातही बनावट चंद्र प्रकाश देत राहील. पथदिव्यांच्या किमतीपेक्षा हा चंद्र स्वस्त असेल. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, 50 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात चीन या बनावट चंद्रप्रकाशापासून वीज खर्चात दरवर्षी 1.2 अब्ज युआन किंवा 173 डॉलर दशलक्ष खर्च वाचवू शकतो.


या आधी चीनने कृत्रिम सूर्य बनवला आहे. या कृत्रिम सूर्यामधून म्हणजेच 'न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर'मधून 17 मिनिटांमध्ये 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. इतक्या कमी वेळात निर्माण झालेली ही उर्जा ही खऱ्या सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेपेक्षा खूप जास्त होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha