Paracetamol Uses : ताप किंवा वेदना कमी करण्यासाठी आपण पॅरासिटामॉलची गोळी घेतो. कारण त्याचा जास्त फायदा होतो आणि डॉक्टरकडे न जाता आपण लवकर बरे देखील होतो. तसे, डोकेदुखी, दातदुखी, सर्दी किंवा फ्लूपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर स्वतः पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस करतात. हे असेच एक औषध आहे, जे या सर्व स्थितींपासून त्वरित आराम देऊ शकते. ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचा वापर अधिक वाढला आहे. अॅसिटामिनोफेन म्हणून ओळखले जाणारे, हे औषध केवळ सौम्य ताप आणि वेदना कमी करण्यासाठी उपयोगी आहे. मात्र, जास्त ताप आणि दुखण्यात ते फारसे फायदेशीर ठरत नाही. तसेच, औषध जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पेयासोबत घेतल्याने आरोग्यास गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे पॅरासिटामॉलची गोळी घेताना पुढील गोष्टी टाळाव्यात.


दारुसोबत पॅरासिटामॉल घेऊ नका
पॅरासिटामॉलची गोळी अल्कोहोलसोबत घेतात त्यांना आणखी नुकसान होऊ शकते. पॅरासिटामॉलच्या गोळ्या अल्कोहोलसोबत कधीही घेऊ नयेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अल्कोहोलमध्ये इथेनॉल असते. इथेनॉलमध्ये पॅरासिटामॉलसोबत मिसळल्यास मळमळ, उलट्या डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी रात्रभर जड पेय पिल्यानंतर पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने तुम्हाला गंभीर धोका होऊ शकतो. दोन्हीच्या मिश्रणामुळे यकृताच्या विषारीपणाचा धोका वाढू शकतो.


पॅरासिटामोल घेण्याची सुरक्षित मर्यादा
पॅरासिटामॉल हे एक सौम्य औषध आहे, परंतु तरीही आपण ते वारंवार वापरू नये. याचे सेवन नेहमी एका मर्यादेत करा. प्रौढ व्यक्ती एका डोसमध्ये एक ग्रॅम पॅरासिटामॉल घेऊ शकतात आणि दररोज 4 ग्रॅम पर्यंत खाऊ शकतात. या मर्यादेच्या पलीकडे जाणाऱ्यांना यकृतासंबंधित त्रास होऊ शकतो. तसेच, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पॅरासिटामॉलचा वापर करावा.


अर्थात, पॅरासिटामॉल वेदना आणि सौम्य ताप यापासून त्वरीत आराम देते, परंतु तुम्ही अल्कोहोलसोबत पॅरासिटामॉल गोळीचे सेवन करू नका.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha