China Artificial Sun : दोन सूर्य असते तर? अशी कल्पना अनेक जण करत असतात  जर दोन सूर्य असते. तर रात्रचं झाली नसती. दोन सूर्य असते तर मानवाला कधीही न संपणारी उर्जा मिळाली असती. त्यातून औद्योगिक कामांनाही फायदा झाला असता. कदाचित यासाठी चीननं आपल्या कृत्रिम सूर्याची चाचणी केली.


कसा आहे कृत्रीम सूर्य 
खरंतर उर्जानिर्मितीसाठी तयार केलेला हा सूर्य याआधीही अॅक्टिव्ह केला. मात्र, 30 डिसेंबरला जे घडलं ते ऐतिहासिक होतं. कारण, 'न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर'मधून 17 मिनिटांमध्ये 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. इतक्या कमी वेळात निर्माण झालेली ही उर्जा ही खऱ्या सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेपेक्षा खूप जास्त होती.त्यामुळे चीनमध्ये तरी हा प्रयोग यशस्वी मानला जातोय. पण, या प्रयोगामुळे जगाची चिंता मात्र वाढलीय. कारण, त्याचा थेट परिणाम नैसर्गिक सौर्यउर्जेवर होवू शकतो.अद्यापवर यावर स्पष्टता नाहीय. 


यापूर्वी याच कृत्रिम सूर्यातून 1.2 कोटी अंश ऊर्जा उत्सर्जित झाली होती.  त्यावेळीही अवघ्या जगभरात चर्चा झाली होती.पण, यावेळी चर्चेपेक्षा चिंता वाढलीय. 'हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेस'कडून 'एक्सपेरिमेन्टल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामाक' प्रोजेक्ट सुरू केला आहे. इथं हायड्रोजनच्या साहाय्यानं हेलियम तयार करण्यात येतो. त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha