Instagram Paid Subscriptions : मेटाच्या (Meta) मालकीचा फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने (Instagram) नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. इंस्टाग्रामने सदस्यतांची/ सबस्क्रिप्शन (Subscription) चाचणी सुरू केली आहे. हे नवे फिचर सबस्क्रिप्शन घेतलेल्या वापरकर्त्यांना काही गोष्टी करण्यासाठी विशेष परवानगी देते. दरम्यान सबस्क्रिप्शन केवळ कंटेट बनवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी असेल. म्हणजे रिल्स किंवा व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी सबस्क्रप्शन असेल. त्याऐवजी इतर वापरकर्ते इंस्टाग्रामवर निशुल्क फोटो पोस्ट करु शकतील. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "सबस्क्रिप्शन फक्त निर्मात्यांसाठी (Content Creater) आहेत."
इंस्टाग्रामवर रिल्स किंवा व्हिडिओ असे कंटेट बनवणाऱ्यांसाठी इंस्टाग्राम नवे सबस्क्रिप्शन फिचर आणणार आहे. सबस्क्रिप्शनमुळे कंटेट निर्मार्त्यांना युजर्ससोबत विशेष लाईव्ह सत्रे आणि परस्पर संवाद उत्तम प्रकारे करता येईल. या फिचरमुळे लाईव्ह सत्रामध्ये चाहत्यांबरोबर स्टिकर्ससह परस्पर संवाद साधता येईल. निर्मात्यांना कमेंट आणि मेसेजच्या पुढे सदस्य बॅच (Subscriber Badge) दिसेल, यामुळे त्यांना त्यांचे फॉलोअर्स सहजपणे दिसतील.
सध्या, इंस्टाग्राम सबस्क्रिप्शन सेवा यूएसने एका छोट्या गटावर या नव्या फिचरची चाचणी सुरु केली आहे. बास्केटबॉलपटू सेडोना प्रिन्स, ऑलिम्पियन जॉर्डन चिलीस आणि ज्योतिषी अलिझा केली यांच्यासह दहा निर्माते प्रारंभिक चाचणीचा भाग आहेत. येत्या आठवड्यात आणखी निर्माते जोडले जातील.
आज एका व्हिडिओमध्ये, इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणतात की, "सबस्क्रिप्शन हा प्रभावशाली आणि निर्मात्यांसाठी अंदाजे उत्पन्न मिळविण्यासाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे." टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकने सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Sahara Desert : सहारा वाळवंटावर बर्फाची चादर, फोटो व्हायरल, तुम्हीही नक्की पाहा...
- सलाम... सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये!
- Mumbai Bomb Blast : 1993 बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानकडून सुरक्षा, जंगी खातिरदारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha