एक्स्प्लोर
हेरगिरीच्या आरोपातील अमेरिकन महिलेची चीनकडून सुटका
मुंबई : हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अमेरिकन महिलेला चीनमधील न्यायालयानं मुक्त केलं आहे. सँडी फान गिलिस या अमेरिकन महिलेला मुक्ततेचा आदेश देत अमेरिकेला जाण्याची परवागनी दिली आहे. मंगळवारी सँडीला साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तिनं आधीच दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानं उर्वरित शिक्षा माफ करण्यात आली आहे.
सँडी गिलिसला 2015 मध्ये चीनमधील प्रवासादरम्यान हेरगिरीच्या आरोपातून अटक करण्यात आली होती. सँडी अमेरिकेतून चीनमध्ये गेलेल्या व्यापाऱ्यांच्या समूहाची सदस्य होती. महत्त्वाची बाब म्हणजे सँडीच्या पतीवरही चीननं 1996 मध्ये हेरगिरीचा आरोप लावला होता.
शुक्रवारी सँडी आणि जेफ चीनमधून अमेरिकेसाठी रवाना झाले. चीननं हेरगिरीच्या आरोपातून अटक केलेल्या महिलेची सुटका करणं दोन्ही देशांमधील तणाव कमी होत असल्याचं समजलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement