एक्स्प्लोर
VIDEO: थरारक फोटोचा थरारक व्हिडीओ
टोकियो : आश्चर्याने डोळे विस्फारायला लावणारा हा फोटो पाहून अनेकांना अनेक प्रश्न पडले असतील. इलेक्ट्रिक पोलवर चढलेला चिम्पांझी आणि त्याला हटकणारा कर्मचारी या फोटोमध्ये दिसत आहेत. मात्र या फोटोमागील कहाणीही थरारक आहे.
चाचा नावाचा हा चिम्पाझी जपानच्या एका प्राणीसंग्रहालयातून पळाला होता. प्राणीसंग्रहालयाच्या कठडा पार करून 'चाचा' गुरुवारी पसार झाला.
या चिम्पांझीची शोधाशोध करून, प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना अक्षरश: घाम आला.
प्राणीसंग्रहालयातील सीसीटीव्हीच्या आधारे 24 वर्षीय 'चाचा'चा शोध सुरु झाला. मात्र प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी मागावर असल्याचं दिसताच, 'चाचा'ने थेट विद्युत खांबावर झेप घेतली. 'चाचा' सरसर चढत थेट खांबाच्या टोकावर पोहोचला. या खांबावरून विद्युत वाहिनी प्रवाहित होती.
मात्र या चिम्पांझीला तिथून खाली उतरवणं आवश्यक होतं. यासाठी प्राणी संग्रहालायातील कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एका क्रेनमध्ये चढून त्याला बेशुद्ध पाडणाऱ्या एकप्रकारचा बाण बंदुकीतून मारण्याचा ठरवलं. मात्र कर्मचाऱ्याची हालचाल पाहून 'चाचा' आक्रमक झाला आणि त्यानेच कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर 'चाचा'ने थेट पोलवरील वायर्सच्या सहाय्याने एका पोलवरून दुसऱ्या पोलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी 'चाचा' खाली घसरला आणि खाली लावलेल्या जाळ्यात कोसळला.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement