Indian Family Murder In California:   अमेरिकेत आठ महिन्याच्या मुलीसह अपहरण करण्यात आलेल्या पंजाबी  कुटुंबाचे मृतदेह (Indian Family Murder In California) आढळले आहेत. या सर्वाचे मृतदेह एका बागेत आढळले आहेत. या घटनेची माहिती कॅलिफोर्नियाच्या शेरिफ यांनी दिली आहे. बागेत आढळलेल्या मृतदेहांमध्ये आई, वडिल, काकांसह आठ महिन्याच्या मुलीचा देखील समावेश आहे.


मर्स्ड काऊंटी शेरिफ म्हणाले की, या सर्वांचे मृतदेह मर्स्ड काऊंटी येथे आढळले. त्या अगोदर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चार जणांचे 3 ऑक्टोबरला दक्षिण हायवे 59 च्या 800 ब्लॉक येथून जबरदस्तीने  अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी एका अपहरण केलेल्या एका संशयित व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी 48 वर्षीय संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.


मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण केलेले कुंटुंब हे भारतातील आहे. पंजाबच्या होशियापूर जिल्ह्यातील टांडा येथील ते रहिवासी आहेत. या कुटुंबाचा अमेरिकेत स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. जसदीप सिंह (36 वर्षे), जसदीप यांची पत्नी जसलीन कौर (27 वर्षे), मुलगी अरूही धेरी (आठ महिने) आणि अमनदीप सिंह (39 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.


सोमवारी या कुटुंबाची कार जळालेल्या अवस्थेत आढळली. या शिवाय मृत व्यक्तीपैकी एकाच्या एटीएम कार्डचा वापर अपहरण करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी एटीएमचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर येशू मॅन्युअल सालगार्डो या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सालगोर्डाला रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर चौकशी केली.


 या कृत्यामागे अपहरण करण्याऱ्या व्यक्तीचा नेमका हेतू काय होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारण अपहरण करणऱ्या व्यक्तीने  संपर्क साधला नाही तसेच खंडणीची मागणीही केलेली नाही. अपहरण केलेल्या व्यक्तीकडे शस्त्र आहेत. त्यामुळे ती धोकदायक होती.  या प्रकरणी चौकशी सुरू असून त्यांच्या ऑफिसमधील, घराजवळ राहणाऱ्या अनेकांची चौकशी केली जात आहे. 


बंदुकीच्या धाक दाखवत चार जणांचे अपहरण


एक व्यक्ती भिकारीच्या वेशात त्यांच्या ऑफिसमध्ये आली आणि बंदुकीच्या धाक दाखवत चार जणांचे अपहरण केले. अपहरण करण्यासाठी दोन भावांनी कारचा वापर केला होता. घटनास्थळावरून अपहरण झालेल्या व्यक्तीचे मोबाईल पोलिसांना मिळाले असून कुटुंबाची कार जाळण्यात आली आहे.  अपहरणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :