एक्स्प्लोर

ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर

लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जात आहे.

लंडन : कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा म्हणतो. पण आता हिच कॉफी इंधन म्हणून वापरली जाते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर, तुमचाही विश्वास बसणार नाही. पण लंडनमध्ये हे खरंच होतं आहे. लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जात आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ही मोहीम लंडन शहरात सुरु करण्यात आली. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर हेच इंधन इतर वाहनांसाठीही वापरता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लंडनमधील ‘बायो-बीन लिमिटेड’ या कंपनीने हा प्रयोग राबवला आहे. कंपनीने एका वर्षात कॉफीच्या वेस्टपासून बनवलेल्या तेलाचा साठा बस चालवण्यासाठी तयार करुन ठेवला आहे. कंपनीच्या अहवालानुसार, लंडनमधील नागरिकांच्या कॉफी सेवनानंतर उरलेल्या चोथ्यामधून वर्षभरात दोन लाख टन कचरा तयार होतो. हाच कचरा कंपनीने कॉफीची दुकाने आणि कॉफीवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडून विकत घेऊन, त्यापासून तेल निर्मिती केली आहे. कॉफीच्या कचऱ्याचे हे तेल बी 20 या जैव इंधनामध्ये मिसळले जाते. अशा प्रकारे टाकाऊ कचऱ्यापासून आपण इंधन निर्मिती करु शकतो, याचे हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे बायो-बीनचे संस्थापक ऑर्थर केय यांनी दावा केला आहे. सध्या, हे इंधन ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ने (टीएफएल) कमी धूर उत्सर्जित करणाऱ्या आणि जैव इंधनावर चालणाऱ्या बसेसमध्ये वापरण्याला प्राधान्य दिलं आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे लंडनमधील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा

युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी

Embed widget