एक्स्प्लोर
लेबनानच्या बेरुतमध्ये भीषण स्फोट; घरांच्या खिडक्या फुटल्या, फॉल्स सीलिंगही कोसळल्या
काही स्थानिक न्यूज चॅनलच्या माहितीनुसार, बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते. बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे.
बेरुत : लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे राजधानी शहरातील अनेक भाग हादरले. शहरात काळ्या धुराचे लोट दिसत होते. काही स्थानिक न्यूज चॅनलच्या माहितीनुसार, बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते.
बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे. घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले, त्यामध्ये गाड्या आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येत आहे. धूर हळूहळू सर्वत्र पसरत आहेत आणि अचानक स्फोट होत असल्याचंही दिसून येत आहे.
भीषण स्फोटानंतर लेबनानमधील भारतील दुतावासाने 01741270, 01735922, 01738418 हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. कोणत्याही भारतीयाला मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता असं भारतीय दुतावासाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement