एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : विमानाचं तिकीट काढून भिकाऱ्याचा प्रवास, भीकही मिळवली
इराणला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात भिकाऱ्याने भीक मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई : आतापर्यंत तुम्ही ट्रेन किंवा बसमध्ये भिकारी चढल्याचं पाहिलं असेल. पण विमानात भिकारी चढेल, अशी कल्पना तरी तुम्ही करु शकता का? कल्पनेच्या पलिकडचा हा प्रकार चक्क कतारमध्ये घडला आहे.
कतार एअरवेजच्या विमानात हा अजब प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोहाहून इराणमधील शिराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने हे विमान निघालं होतं.
विमान सुरु होण्यापूर्वी एक मध्यमवयीन पुरुष हातात प्लास्टिकचं पाऊच धरुन पैसे मागत होता. विशेष म्हणजे एका प्रवाशाने त्याच्या हातात नोटही दिली.
भीक मागणाऱ्या व्यक्तीचे केबिन क्रूसोबत खटकेही उडाले. हवाई सुंदरीने त्याला खाली बसण्याची विनंती केली. या प्रकारामुळे विमान काही मिनिटं खोळंबलं.
भीक मागणाऱ्या व्यक्तीने विमानाचं तिकीट कसं काय बुक केलं, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडियावर अपलोड करताच तो जगभरात व्हायरल झाला.
कराची विमानतळावरुन बँकॉकला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडल्याच्या अफवा सुरुवातीला उठल्या होत्या. काही जणांनी ती व्यक्ती पाकिस्तानी असल्याचं ठरवून टाकलं, मात्र पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाने या अफवांचं खंडन केलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement