El Nino : अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेनं एल निनोचे (El Nino) आगमन झाल्याचं जाहीर केलं आहे. यामुळं नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दर महिन्याच्या नऊ तारखेला एल निनोची नेमकी परिस्थिती काय? यासंदर्भात अमेरीकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननं (NOAA)संस्थेकडून माहिती देण्यात आली आहे.
हिवाळ्यात एल निनो आणखी मजबूत होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) सांगण्यात आलं आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून एल निनोचा प्रभाव दिसेल. सोबतच हिवाळ्यात तो सर्वाधिक असेल असं देखील भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला एल निनोची नेमकी काय परिस्थिती आहे? यासंदर्भात अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून माहिती दिली जात असते. एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचं अमेरिकेच्या हवामान संस्थेनं जानेवारी महिन्यातच जाहीर केलं होतं. अशातच आता एल निनोचं आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये हिवाळ्यात तो आणखी मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून वर्तवण्यात आली आहे.
एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे. जी विषुववृत्ताजवळ मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाने चिन्हांकित केली जाते. जी सरासरी दर दोन ते सात वर्षांनी येते. एल निनोचा हवामानावरील प्रभाव प्रशांत महासागराच्या पलीकडे पसरलेला आहे. एल निनोमुळं जगभरात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि दुष्काळाचा धोका वाढतो. याचा मोठा फटका नागरिकांना बसतो.
'एल निनो' म्हणजे काय?
अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापतं. यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढते. त्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळं हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळं भारतात पाऊसमान कमी होतं. एल निनोचा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. एल निनोमुळं मान्सूनच नाही तर
हिवाळा देखील उबदार होतो. तसेच उन्हाळा देखील आणखी गरम होतो.
याआधी दुष्काळ एल निनोमुळेच
एका अहवालानुसार भारतानं 2002, 2004, 2009 आणि 2012 या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. त्यामुळं पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारनं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: