Rohit sharma viral Video : ओव्हलवर सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी निराश केले तर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी हराकिरी केली. पहिल्या दिवशीच रोहित शर्माचा पारा चढलेला दिसला. रोहित शर्माने आपल्या संघातील खेळाडूला शिवीगाळ केल्याचं समोर आलेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसतेय की, अष्टपैलू रविंद्र जाडेजा गोलंदाजी करत आहे. त्यावेळी रोहित शर्मा इतर खेळाडूंशी चर्चा करत होता. त्याचवेळी पुजाराचे नाव घेत शिवी दिल्याचे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


पाहा व्हिडीओ






रोहित शर्माचा फ्लॉप शो - 


र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताची फलंदाजांनी निराश केलेय. अवघ्या 71 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. भारताचे सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात तंबूत परतले. कर्णधार रोहित शर्मा याला आपल्या लौकिकस साजेशी कामगिरी करता आली नाही.  ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने भारताच्या कर्णधाराला बाद केले. रोहित शर्मा 15 धावा काढून बाद झाला. मोक्याच्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आपेक्षा होती. पण रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला. 


टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट 


जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 151 अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे 29 धावांवर आणि श्रीकर भरत 5 धावांवर खेळत होते. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तीन बाद 327 धावांवरून पहिल्या डावात सर्व बाद ४६९ धावांची मजल मारली. भारताकडून मोहम्मद सिराजनं 108 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. पण भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय फलंदाजांना न्याय देता आला नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजानं 71 धावांची झुंजार भागीदारी रचली. पण नॅथन लायननं जाडेजाला माघारी धाडून ही जोडी फोडली. त्यामुळं टीम इंडियासमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान 270 धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही 119 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडिाय अद्याप 318 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि केएस भरत मैदानावर आहेत.