एक्स्प्लोर

Amazon Fire | अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार

ब्राझीलचं सर्वात मोठे शहर भरदिवसा अंधाराने व्यापलं आहे. दुपारी पसरलेल्या अंधारामुळे लोकांना प्रकाशासाठी गाडीच्या हेडलाईट्सचा वापर करावा लागत होता. या काळ्या धुराने अॅमेझॉन जंगलापासून शहरापर्यंत 1700 मैलांचा प्रवास केला.

साओ पाओलो : दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझीलमध्ये असलेलं जगातील सर्वात मोठं जंगल आणि जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉनचं जंगल आगीत धुमसत आहे. इथे दरवर्षी आगीच्या अनेक घटना समोर येतात, पण सध्याच्या आगीने रौद्र आणि भयावह रुप धारण केलं आहे. तीन आठवड्यांपूर्वी लागलेली आग अजूनही तशीच आहे. या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोमध्ये भरदिवसा अंधार झाला आहे. आगीममुळे ब्राझीलचं 2700 किमी क्षेत्र प्रभावित झालं आहे. Amazon Fire | अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार या भीषण आगीच्या ज्वाळांमधून निघणारा धूर अंतराळातूनही पाहता येऊ शकतो. जागतिक हवामान संघटनेच्या आकडेवाडीनुसार वायव्येतील पर्जन्य वृष्टीपासून अटलांटिक किनाऱ्यावरुन हजारो मैल दूर असलेल्या रिओ दे जनेइरोपर्यंत धूर पसरला आहे. सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी साओ पाओलोमधील आश्चर्यकारक फोटो समोर आले. ब्राझीलचं सर्वात मोठे शहर भरदिवसा अंधाराने व्यापलं आहे. दुपारी पसरलेल्या अंधारामुळे लोकांना प्रकाशासाठी गाडीच्या हेडलाईट्सचा वापर करावा लागत होता. या काळ्या धुराने अॅमेझॉन जंगलापासून शहरापर्यंत 1700 मैलांचा प्रवास केला. Amazon Fire | अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार वर्षभरात 72000 हून अधिक ठिकाणी जंगलात आगीने पेट घेतला असून ब्राझीलचं अंतराळ संशोधन केंद्राच्या आयएनपीईनुसार मागील गुरुवारपासून आगीचं प्रमाण वाढल्याचं दिसलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अॅमेझॉन जंगलात लागलेल्या आगीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धुराच्या ढगांमुळे उत्तरेकडील रोरायमा राज्य कोरडे पडले आहे. अॅमेझॉनस राज्याने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि अटलांटिक महासागरामध्येही धुळीच्या कणांचे ढग पसरले आहेत. ब्राझीलच्या अध्यक्षांचा एनजीओवर आरोप ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बॉल्सनोरो यांनी आगीसाठी जंगलतोड करणाऱ्या कंपन्यांना जबाबदार ठरवलं आहे. अॅमेझॉन जंगलात ब्राझीलने विकासकामासाठी काही ठिकाणी वृक्षतोड केली. त्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बॉल्सनोरो यांनी जंगलतोड करणाऱ्या कंपन्यांना काम काम थांबवण्यास सांगितलं. आर्थिक मदत कमी केल्याने त्याच कंपनीने ही आग लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बॉल्सनोरो म्हणाले की, या कंपनीचा अॅमेझॉन जंगलात जाण्यामागचा उद्देश हा आग लावण्याचाच होता. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या दाव्यांबद्दल पुरावे मागितले असता ते म्हणाले की, याचा कोणताही लेखी पुरावा माझ्याकडे नाही, या गोष्टी अशा केल्या जात नाहीत. या आगीत अॅमेझॉन जंगलात राहणारे काही आदिवासींचा मृत्यू झाला आहे, तर काही जखमी आहेत. जंगलातील प्राण्यांचे तर स्थिती अतिशय वाईट आहे.  ठिकठिकाणी मृत प्राणी वा त्यांचे अवशेष दिसत आहेत. Amazon Fire | अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार हॉलिवूड-बॉलिवूड सेलिब्रिटींकडून चिंता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कॅमिला कॅबेलो, अरियाना ग्रेंडे, लिओनार्डो दि कॅप्रिओ,जीजी हदीद मॉडेल, केंडाल जेन्नर, जेडन स्मिथ, नोव्हा सायरस आणि अनेक सेलिब्सनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. हे कलाकार या घटनेबद्दल ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृती करत आहेत. फक्त हॉलिवूड नाही तर बॉलिवूडचे कलाकारांनीही याबद्दल ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही घटना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. भूमी पेडणेकर, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, दिया मिर्झा, दिशा पाटणी, आयुष्मान खुराना यांनीही अॅमेझॉनच्या आगीबद्दल विविध पोस्ट केल्या आहेत. ट्विटरवर #PrayforAmazonas ट्रेण्ड Amazon Fire | अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार ट्विटरवर #PrayforAmazonas ट्रेण्ड होत आहे. लोक याद्वारे ब्राझीलचं सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना आवाहन करत आहेत की, अॅमेझॉनचं जंगल वाचवण्यासाठी काहीतरी करा. आतापर्यंत #PrayforAmazonas या हॅशटॅगने अडीच लाखांपेक्षा जास्त ट्वीट केले आहेत. का खास आहे अॅमेझॉनचं जंगल? अॅमेझॉनचं जंगल 55 लाख चौरस किमी क्षेत्रात पसरलं आहे. युनायटेड किंग्डममधील देशांच्या क्षेत्रफळापेक्षा हे जंगल दीडपट मोठं आहे. अॅमेझॉनच्या जंगलांना जगाचं फुफ्फुसही म्हटलं जातं. कारण जगात उपलब्ध ऑक्सिजनचा 20 टक्के भाग या जंगलातून उत्सर्जित होतो. अॅमेझॉनच्या जंगलात 16 हजारांपेक्षा जास्त झाडं-झुडपांच्या प्रजाती आहेत. या जंगलात सुमारे 39 हजार कोटी झाडं आहेत. इथे 25 लाखांपेक्षा जास्त किटकांच्या विविध प्रजाती सापडतात. अॅमेझॉनच्या जंगलात 400 ते 500 पेक्षा जास्त आदिवासी जाती राहतात. यापैकी सुमारे 50 टक्के आदिवासी जातींचा तर कधी बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget